Saturday, September 17, 2011

Hi new learners.
Initially everything seems so impossible!! Till you start getting the hang of it . Collaborating when you get stuck is soooooooo necessary!!

Thursday, September 15, 2011

MI1


उत्कृष्ट अध्यापनासाठी : बहुविध बुद्धिमत्तांवर आधारित अध्यापन पद्धती, तंत्र व क्लृप्त्या

लेखिका:
डॉ. मृदुला रानडे
P.G. Dept. od Education, Pune,
SNDT Women’s University.
With Dr. Howard Gardner

प्रास्ताविक

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे व प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्त गुण ओळखून त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देणे हे शिक्षणाचे एक अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट असते. त्या साठी अभ्यासेतर उपक्रमांत काही प्रमाणात प्रयत्न देखील केले जातात, परंतु वर्गाध्यापनात या उद्दिष्टाला अगदी दुय्यम स्थान मिळते. परीक्षा हेच दैवत व उत्तम गुण मिळ्विणे म्हणजेच या दैवताची सर्वोत्तम आराधना मानणा-या आपल्या समाजात या पासून विचलित करणा-या कोणत्याही कृतीत वेळ घालविणे म्हणजे वेडेपणा मानला जातो.
अध्ययन-अध्यापन पद्धती, तंत्र व क्लृप्त्यांचा पुस्तकात समावेश करतांना सरावासाठी तसेच मूल्यमापनासाठी (Formative evaluation) वर्गातच वापरता येतील अशा तंत्रांचा देखील विचार केला गेला आहे. मूल्यमापन हा अध्यापनाचा अविभाज्य घटक आहे. अशा मूल्यमापनातून विद्यार्थ्यांना व शिक्षकाला प्रत्याभरण मिळाल्याखेरीज अध्यापन यशस्वी होऊ शकत नाही.
या पुस्तकातील बहुतांश पद्धती किंवा तंत्र प्रत्यक्ष अध्यापनासाठी उपयुक्त आहेत, परंतु काही महत्त्वपूर्ण पूरक तंत्रांचा देखील यात समावेश केलेला आहे, (उदा. विचार कौशल्ये, सर्जनशीलता व अभ्यास कौशल्ये विकसित करण्यासाठी तंत्र, मूल्यांच्या रुजवणूकीची तंत्र, ,स्वयं-अध्ययन तंत्र) कारण ती तंत्रे विशिष्ट बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, तसेच अध्यापनाची काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे त्यांच्या वापराशिवाय पूर्ण होत नाहीत....
लेखिकेने अध्यापन पद्धती तंत्रे एकत्रितपणे सादर करण्याचे काम करून त्या पद्धती किंवा तंत्र चटकन लक्षात येण्याच्या दृष्टीने त्यांची काही उदाहरणे सुचविली आहेत. प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाशी संबंधित उदाहरणे सुचविणे मात्र शक्य नाही. या पुस्तकात दिलेल्या कल्पनांच्या आधारे स्वतःच्या वर्गात स्वतःच्या अध्यापन विषयातील विशिष्ठ घटकासाठी शिक्षकाला स्वतःच पाठनियोजन करावयाचे आहे. हे करत असतांना असंख्य कल्पनांपैकी प्रत्येक बुद्धिमत्तेला चालना मिळेल अशा कल्पना निवडून त्यांची सुरेख गुंफण करायची आहे.
यात उल्लेख केलेल्या -याच पद्धती/ तंत्रांच्या वापरातून एकाहून अधिक बुद्धिमत्तांना चालना मिळते. त्यामुळे विशिष्ठ बुद्धिमत्तेखाली विशिष्ठ तंत्राचे वर्गीकरण करतांना अडचण येते. विशिष्ठ पद्धती/ तंत्रांच्या वापरातून ज्या बुद्धिमत्तेला अधिक चालना मिळते, त्या बुद्धिमत्तेअंतर्गत त्या पद्धती/तंत्राची चर्चा केली आहे.
काही पद्धती/तंत्रांच्या वापरातून अनेक बुद्धिमत्तांना चालना मिळते (उदा. रचना उपपत्तीआधारे अध्यापन, संगणक सहाय्यित अनुदेशन). अशा पद्धतींची चर्चा पुस्तकाच्या शेवटच्या भागात केली आहे.
शिक्षक प्रशिक्षणात अध्यापनाच्या प्रतिमानांना बरेच महत्त्व दिले जाते. प्रतिमानांची स्वतंत्र पुस्तके उपलब्ध आहेत, त्यामुळे सर्व प्रतिमानांचा या पुस्तकात समावेश केलेला नाही. त्यातील एखाद दुस-या प्रतिमानाच्या वापराचीच इथे चर्चा केली आहे.
अनुभवी शिक्षक यातील -याच कल्पना आपल्या अध्यापनात वापरत देखील असतील. त्यांना देखील हे पुस्तक उपयोगी पडेल, कारण कोणत्या कृती कोणत्या बुद्धिमत्तांना चालना देतात हे त्यांच्या लक्षात येईल, त्या नुसार त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना साजेश्या अशा कृतींचा ते अध्यापनात समावेश करून घेऊ शकतील. बरेचदा आपल्याला माहित असलेल्या पद्धती तंत्रांबाबत आपल्याला विसर पडतो, त्या योग्य वेळी आठवल्यामुळे त्यांचा वापर होऊ शकत नाही. शिक्षकांच्या मेंदूला चालना देण्याचे काम हे पुस्तक नक्कीच करेल.

हे पुस्तक कोणी वाचावे

कोणत्याही विषयाचे अध्यापन करणा-या, तसेच कोणत्याही स्तरावर अध्यापन करणा-या शिक्षक किंवा प्राध्यापकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पूर्व प्राथमिक वर्गांसाठी विशेषकरून वापरल्या जाणा-या तंत्रांचा मात्र या पुस्तकात पुरेसा समावेश केलेला नाही. डी.एड., बी.एड. एम. एड. च्या विद्यार्थी शिक्षकांसाठी हे पुस्तक वरदान ठरेल. पाठ नियोजनात त्यातील नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर केल्यास पाठांचा दर्जा नक्कीच उंचावेल.
प्रस्तुत पुस्तकात बी.एड एम. एड च्या अभ्यासक्रमातील अनेक पाठ्यघटकांचा समावेश आहे, जसे ज्ञानरचनावाद (Constructivism), मेंदू संशोधनाचे अध्ययन-अध्यापनासंदर्भात उपयोजन, समस्या निराकरण, सर्जनशीलतेची बुद्धिमंथनासारखी तंत्र, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, स्वयं-अध्ययन तंत्र, बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती, इत्यादी.

Click on the link below to view my PowerPoint on Multiple Intelligences
http://www.mridularanade.com/html/works.htm